नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅस सिलिंडर मधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. सरकारच्या या अन्यायी इंधन दरवाढीविरोधात आज दि.७ रोजी ११ वा पाडळी फाटा ता इगतपुरी येथे आंदोलन करण्यात आले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशान्वये तसेच
आ. हिरामणजी खोसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,जेष्ठ नेते जनार्दन मामा माळी,प्रांतिक सदस्य कचरू पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित मा जि सदस्य संदिप गुळवे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे ,तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, जिल्हा सरचिटणीस गोपाळ लहांगे, उत्तम भोसले,कार्याध्यक्ष अरूण गायकर,पुंडलिक धांडे,युवक सचिव भास्कर गुंजाळ,किसान अध्यक्ष सुदाम भोर,सेवादल अध्यक्ष दिलीप पाटील,निवृत्ती कातोरे,मल्हारी गटखळ, संपतराव मुसळे,उपाध्यक्ष बाळासाहेब लंगडे,ज्ञानेश्वर कडू, कमलाकर नाठे, किरण पागेरे, पंढरी लंगडे, जयराम धांडे, दिनेश धोंगडे ,उत्तम बिन्नर, कैलास घारे,रमेश देवगिरे,आकाश भोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment