गोदावरीत मिसळल्या जाणाऱ्या सांड-पाण्यामुळे ओढा-एकलहरे रस्त्यावरील सामनगाव पुलावर फेसाचे ढीग.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
गोदावरीत मिसळल्या जाणाऱ्या सांडपाण्याला आलेल्या फेसामुळे ओढा-एकलहरे रस्त्यावरील सामनगाव पुलावर फेसाचे ढीग पहावयास मिळत आहे.
गोदेच्या काठावर महापालिका प्रशासनाने ठिकठिकाणी मल जल निस्सारण केंद्रे उभारली आहेत. या केंद्रात मलजलावर प्रक्रिया करुन सांडपाणी गोदापात्रात सोडले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी हे चित्र मात्र हा दावा संपुर्णपणे फोल ठरविणारे आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच सकाळी गोदावरीच्या पात्रात असे फेसाचे डोंगर उभे राहिल्याचे पहावयास मिळाले असून महापालिका प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे मात्र ग्रामस्थाना या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.
No comments:
Post a Comment