सफाळे ( हिरालाल लोखंडे ) पालघर तालुक्यातील मौजे सोनावे , दारशेत उंबरपाडा या विभागातून रात्रीच्या वेळी शासनाची रेती उत्खनन / वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवानगी नसताना, विना रॉयल्टी स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी, चोरीच्या उद्देशाने रेती उत्खनन व वाहतूक केली जात आहे. अशी खात्रीलायक, गोपनीय माहिती मा. तहसिलदार साहेब याना प्राप्त झाली असताना
दिनांक ७ जून २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान श्री धनाजी तोरस्कर साहेब प्रांत अधिकारी पालघर, श्री सुनिल शिंदे साहेब तहसिलदार पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजु पाटील मंडल अधिकार सफाळे, श्री किरण जोगदंड तलाठी सजा टेंभिखोडावे. श्री रत्नदिप दळवी तलाठी सजा सफाळे उंबरपाडा, मनोज कुडू कोतवाल. व सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक. श्री महेंद्र शर्मा पोलीस हवालदार श्री कैलास शेळके पोलीस नाईक श्री ए व्ही खोत पोलीस नाईक श्री सुभाष राठोड पोलीस काॅन्सटेबल श्री राजेंद्र घुगे पोलीस शिपाई यांच्या पथकाने व महसुली विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून, जे सी बी च्या सहाय्याने रेती साठवून ठेवण्यासाठी तयार केलेल्या कुंड्या समूळ नष्ट करून रेती साठा जमिनीवर पसरवून नष्ट केला. या धडक कारवाई मुळे रेती माफियांच्या मनात भिती वजा जरब निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment