Wednesday, June 9, 2021

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व परवाना विषयक कामकाज तसेच इतर कामकाज मर्यादीत स्वरुपात दि. 09 जून पासून सुरु

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व परवाना विषयक कामकाज तसेच इतर कामकाज मर्यादीत स्वरुपात दि. 09 जून  पासून सुरु


पालघर (प्रतिनिधी)दि. 09 :- परिवहन आयुक्त कार्यालय यांचेकडून दि. 07 जून 2021 रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती प्रमाणात मर्यादीत स्वरुपात शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत देणे इत्यादि तसेच वाहन हस्तांतरण वाहनास नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, कर्ज बोजा चढविणे / उतरविणे इत्यादि कामकाज तसेच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करणे व परवाना विषयक कामकाज हे मर्यादीत स्वरुपात दि. 09 जून 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
उपरोक्त सर्व कामकाजाकरिता दैनंदिन कोटा निश्चित करण्यात आलेला असून अर्जदारांना ऑनलाइन स्वरुपात अर्ज करणे अनिर्वाय आहे. अर्जदारांनी ज्या दिनांकाची अपॉईंटमेंट घेतलेली असेल त्याच दिवशी कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या अर्जदारांनी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतली नाही त्यांनी कार्यालयात विनाकारण गर्दी करू नये. तसेच येणाऱ्या सर्व अर्जदारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब न चुकता करावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी केले आहे. 
*******

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...