Wednesday, June 9, 2021

शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात

*शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात*

पालघर (प्रतिनिधी)दि 9 :जिल्ह्यात आज दिनांक ०७.०६.२०२१ अखेर ४३ मिमी पाऊस झालेला असून खरीप हंगमातील पेरणीला सुरुवात झाली आहे. तरी शेतक-यांनी ८० टक्के ओलावा असणा-या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात. भात रोपवाटिका तयार करावयाच्या क्षेत्रामध्ये जमीन नांगरून ढेकळे फोडावीत. प्रति गुंठा क्षेत्रास १०० किलो शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच नीच-याच्या जागी तळाशी १२० से मी लांबी ते ९० से.मी. रुंदी व ८ ते १० से. मी उंचीचे उतारानुसार पेरणी योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावेत. जर शेतकरी स्वतःकडे राखून ठेवलेले भात बियाणे पेरणीसाठी वापरणार असतील तर त्यांनी बियाण्यास ३ टक्के मीठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी १० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम मीठ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण तयार करताना उपलब्ध भात बियाणे त्यामध्ये बुडेल असे द्रावण तयार करावे. बियाणे द्रावणात टाकल्यावर चांगले ढवळावे. चाळणीच्या सहाय्याने तरंगणारे बियाणे वेगळे करावे. जड व तळाला बसलेले बियाणे वेगळे काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुवून ते ४८ तास सावलीत वाळवावे.

दिनांक १०/०६/२०२१ ते १२/०६/२०२१ या दरम्यान पालघर जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकाडून वर्तविण्यात आली आहे. तरी भात खाचराच्या उताराच्या दिशेने पाणी निचरा होण्यासाठी सांडवा (पाणी जाण्यासाठी मार्ग) ठेवण्यात यावा. त्यामुळे शेतातील पाणी निचरा होण्यास मदत होईल. शेतक-यांनी सावधानगिरी बाळगावी व आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच वाळलेल्या चारा पावसात भीजू नये म्हणून सूरक्षीत ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री के. बी. तरकसे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...