राष्ट्रीय महामार्गावर खैर चोरांचा वावर !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ६ जुन २०२१ रोजी रात्री श्री महेश उतेकर वनपाल गांजा ढेकाळे येथील ढेकाळे येथे आपल्या कर्तव्यावर असताना, त्यांना माहिती मिळाली की चोरट्या रितीने खैराची तोड केलेले, लाकडे भरलेली गाडी या मार्गाने जाणार आहे. आपल्या सोबत असलेल्या वनकर्मचारी, वनमजूर यांना सोबत घेऊन व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना अचानक पणे अंदाजे रात्री ३ त ३-३० च्या दरम्यान एक टेम्पो ढेकाळे जायशेत रस्त्यावर एक वाहन संशयास्पद रित्या जातांना आढळून आले. त्या वाहनास अडविण्याचा प्रयत्नात असताना, वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ते वाहन ढेकळे गावाजवळ रस्त्यावर पलटी झाले असताना, गाडीचाकल अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
सदर गाडी पिक- अप ,सफेद रंग ( अशोक लेलंड- एम एच ०४ जे के ० ८५६ ) यांची झाडा झडती घेतली असताना त्या पिक अप मध्ये खैराचे एकुण ५९ ओंडके ,आकार - २.७५७ घन मिटर, अंदाजे किंमत २६,७४२ रूपये किंमतीचा मुद्देमाल व पिक अप जप्त करण्यात आली आहे
सदर कारवाई नम्रता हिरे - वनक्षेत्रपाल दहिसर तर्फे मनोर याच्या मार्गदर्शनाखाली महेश उतेकर वनपाल गांजा यांनी महिंद्र मोरे, प्रदीप पवार वनरक्षक व भाईदास सातवी, रमेश किणी ,सुरेश किणी वन मजुर यांच्या सहकार्याने करण्यात आली असून वन अधिनियम १९२७ चे कलम २६ ( १ ) व ड, फ, ४२ ( १ ) प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तपासी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
No comments:
Post a Comment