Thursday, May 6, 2021

अवैधरीत्या सामाजिक प्रसार माध्यमांचा उपयोग करून मुले परस्पर दत्तकास देऊ नये

अवैधरीत्या सामाजिक प्रसार माध्यमांचा 
उपयोग करून मुले परस्पर दत्तकास देऊ नये
पालघर(प्रतिनिधी) दि. 6 : महाराष्ट्रातील अनेक जिल्हातून कोविड परिस्थीतीमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली मुले दत्तकासाठी उपलब्ध आहेत असे संदेश फेसबुक व व्हॉटसअॅप वर फिरत आहेत. परंतु हे मेसेजेस चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली जात नाहीत याची आपल्याला कल्पना आहे. ज्या कोणी कुटुंबांस दत्तक बाळ घ्यावयाचे असेल तर त्यांनी रितसर www.cara.nic.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावे व त्यां नंतर रितसर सदर कुटूंबाची गृहचौकशी जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे होते व त्यां नंतर बाळ कायदेशीर दत्तक प्रक्रिया सुरु होते. तसेच उपरोक्त प्रकारे बेकायदेशीरपणे कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसेल तर अशा बालकांसाठी सोबत दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्यात यावा. तसेच जिल्हात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणा जसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, बाल कल्याण समिती पालघर अध्यक्ष व सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना तात्काळ उपरोक्त गंभीर बाबी विषयी सुजाण नागरीकांनी कळवावे. अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी पुढिल क्रमांकावर संपर्क साधावा.
चाईल्ड लाईन 1098 व पोलीस संपर्क क्र. 103
8308992222 ( सकाळी 8.00 ते रात्री 8.00 )
7400015518 ( सकाळी 8.00 ते रात्री 8.00 )
***********

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...