पालघर _ बोईसर याभागात मोफत शिव भोजन थाळी सुरू करावी यासाठी दिले पत्र. बहूजन विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिले पत्र.
पालघर :(प्रतिनिधी) पालघर बोईसर या भागात सर्वात मोठे औधोगिक क्षेत्र आहे.या भागात अनेक भागातील कामगार वर्ग राहतो .ह्या भागात अनेकांच्या कंपन्या बंद झाल्या आहेत.तसेच हातावर कमवणाऱ्या ची कामेदेखील बंदच आहेत..गेल्या वर्षापासून ह्या महामारी मूळे अनेकांचे कुटुबव्यवस्था बिघडली आहे.ते आपल्या कुंटूबाचे पालन पोषण करणे कठीण झालेआहे.तसेच अनेक कुटुंबे हातावर कमावणारे आहेत.ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन" बहुजन विकास आघाडीचे" पालघर जिल्हा उपाध्यक्ष
विश्वनाथ विष्णू घरत. ह्यांनी पालघर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी ह्यांना निवेदन देऊन शिवभोजन थाळी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे पत्र दिले आहे. मा.मुख्यमंत्री ह्यांनी सांगितल्या प्रमाणे हे जर झाले तर ह्या लोकांवरती उपासमारीची वेळ येणार नाही.
No comments:
Post a Comment