शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनामुळे निधन : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अर्पण केली श्रद्धांजली.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
शिवसेनेच्या प्रभाग क्रं.22 च्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते त्यांच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सत्यभामा गाडेकर या शिवसेनेतील सर्वात आक्रमक नगरसेविका म्हणून गणल्या जायच्या त्यांनी दोन वेळा नाशिक महानगरपालिकेत नासिक रोड कर यांचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेना पक्षात काम करताना त्यांनी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख महिला आघाडी तसेच विविध पदांवर काम केलेले होते त्यांच्या निधनाची बातमी समजताच नाशिकरोडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली अतिशय प्रामाणिक मनमिळावू व दुसऱ्यांसाठी झटणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण गाडेकर दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मी व माझे कुटुंब गाडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment