Sunday, May 9, 2021

मा.जिल्हाधिकारी साहेब,पालघर यांच्या आदेशांचे उल्लंघन ! " लग्न आयोजक, हॉटेल मालक, कॅटर्स, मंडम डेकोरेटर्स वर गुन्हे" दाखल.

मा.जिल्हाधिकारी साहेब,पालघर यांच्या आदेशांचे उल्लंघन !  

" लग्न आयोजक, हॉटेल मालक, कॅटर्स, मंडम डेकोरेटर्स वर गुन्हे" दाखल.
 ,सफाळे ( हिरालाल लोखंडे ) मा. जिल्हाधिकारी साहेब, पालघर यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, अन्वये, लागू करुन संचारबंदी व फौजदारी प्रक्रिया संहिता अधिकारी नियम १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागु केले आहेत. तसेच मा. जिल्हाधिकारी सो, पालघर कडील, १) जा, क्र. जि. आ. व्य. पालघर / कोरोना विषाणू / विवाह परवानगी, कावी- ११७ / २०२१०, दिनांक १४ एप्रिल २०२१, २) No - D M U / 2020 / C R, 92 / D I S M - l , दिनांक २१ एप्रिल २०२१ अन्वये आदेश लागु आहेत. 
  चंद्रप्रकाश घेरीलाल जैन, राहणार सफाळे पोस्ट उंबरपाडा, ता,जि पालघर, यांना २ मे २०२१ रोजी लग्न समारंभासाठी, विनंती अर्ज केला असताना, केळवा सागरी पोलीस ठाणे, ता,जि पालघर, यांनी मा. जिल्हाधिकारी सो, पालघर यांनी लागू केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून मौजे केळवा ता,जि पालघर येथील कोकोनट व्हॅली रिसाॅर्ट येथे दिनांक ७ मे २०२१ ते ८ मे २०२१ अशी हळद व लग्न समारंभासाठी फक्त २५ ( अक्षरी पंचवीस ) लोकांच्या उपस्थित व सर्व नियमांचे / अटींचे पालन करण्याच्या शर्तीवर परवानगी दिली असताना, ७ मे २०२१ रोजी   दुपारी १२- ३० च्या सुमारास कोकोनट व्हॅली रिसाॅर्ट केळवा येथे २५ लोकां पेक्षा जास्त लोकांचा समूह जमल्याचे, ग्रामपंचायत केळवा यांना समजून  आल्यानंतर श्री दिनकर मोढवे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत केळवे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत केळवा ता,जि पालघर यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, शासनाच्या नियमांचा भंग केल्या प्रकरणी आयोजक चंद्रप्रकाश घेरीलाल जैन रा. सफाळे यांना २५०००-/  अक्षरी पंचवीस हजार रूपये, दंड केल्याची माहिती ८ मे २०२१ रोजी, पोलीस ठाणे यांना प्राप्त झाल्याने, पुढील चौकशी साठी, घटनास्थळी पोलीस गेले असताना, मा. जिल्हाधिकारी सो, पालघर यांच्या कडील १) जा. क्र. जि. आ. व्य. पालघर / कोरोना विषाणू / विवाह परवानगी / कावी - ११७ / २०२१ दिनांक १४ मार्च २०२१, २)  NO - DMU / 2020 / CR. 92 / DISM, दिनांक २१ मार्च २०२१ चा आदेश यांचा १) चंद्रप्रकाश घेरीलाल जैन - लग्न आयोजक, रा. सफाळे, २) संजय रघुनाथ घरत - कोकोनट व्हॅली रिसॉर्ट केळवा चे मालक, ३) पुरूषोत्तम रावल - पुनित कॅटरर्सचे व्यवस्थापक,सौ.ममता परेश किणी लग्न मंडप डेकोरेटर्स, यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे भंग करून, कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरण्याचा संभव ,असलेली हायगईची कृती करण्यास  व करविण्यासाठी कारणी भूत आहात, म्हणून सागरी पोलीस ठाणे, केळवा ता,जि पालघर येथे गुन्हा रजि,न २१ / २०२१ कलम भारतीय दंड सहित कायदा कलम १८८,२६९, आपत्ती व्यवस्थापन अधि, २००५ चे कलम ५१ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून वरीष्ठ पोलीस अधिकारी पालघर, यांच्या अधिपत्याखाली श्री हरेश धनगर प्रभारी अधिकारी सागरी पोलीस ठाणे उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास तपासी अंमलदार व कर्मचारी करीत आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...