रक्तदान - सर्व श्रेष्ठदानईद निमित्ताने सफाळे येथे रक्तदान शिबिर
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात निर्माण झालेल्या, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन, राज्यांचे मा. श्री उध्दव ठाकरे - मुख्यमंत्री साहेब यांनी केलेले. या आवाहनाला प्रतिसाद देत, सफाळे पोलीस ठाणे, लोकप्रभाव संस्था सफाळे, मेडिकल असोसिएशन सफाळे, सोशल वर्कर्स सफाळे, सफाळे रेल्वे स्टेशन कमिटी ( DVPSS ) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १४ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत सफाळे पूर्व " देवभुमी हाॅल " मध्ये रक्तदान शिबिराचे, महाराष्ट्र ब्लड बँकेच्या वतीने व डॉक्टर श्री राजेंद्र चव्हाण पालघर यांच्या टीमच्या सहकार्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
ईद निमित्ताने हिन्दू - मुस्लिम बंधुभाव ऐक्याचे दर्शन घडविणारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून विषेश बाब, प्लाझ्मा दात्याची नोंदणी सुध्दा करण्यात येणार आहे.
श्री संदीप कहाळ - प्रभारी अधिकारी सफाळे पोलीस ठाणे, श्री स्वप्नील तरे - लोकप्रभाव संस्था सफाळे, श्री निखिल शहा - सफाळे मेडिकल असोसिएशन, श्री सैफ शेख - सोशल वर्कर्स सफाळे, श्री जतिन कदम सर - सफाळे रेल्वे स्टेशन कमिटी, ग्रामपंचायत सफाळे उंबरपाडा या सर्वानी सफाळे परिसरातील सर्व रक्तदाते, प्लाझ्मा दाते यांना आगाऊ नोंदणी साठी व रक्तदान शिबिरात येऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment