Thursday, April 8, 2021

कोरोना ला आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी एकत्र काम करणे गरजेचे* –जि.प.अध्यक्ष भारती कामडी



*कोरोना  ला आळा  घालण्यासाठी  लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी एकत्र काम करणे गरजेचे* –जि.प.अध्यक्ष भारती कामडी

  पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यात कोरोना च्या वाढत्या रुग्णांना आळा घालायचा असेल तर लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांनी एकत्र काम करणे गरजेचे असून प्रशासनाकडूनही याबाबत वेळोवेळी सहकार्य लाभत आले आहे. जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन नेहमीच याबाबतीत जागरूक असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांनी केले.आज दि.८  एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदे अध्यक्षा  भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभापती सर्व ,जि.प.सदस्य सर्व,पं समिती उपसभापती यांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.
  एका महिन्यात कोरोना चे रूग्ण दोन हजारावर जाऊन पोचले असून एप्रिल महिन्यात सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून ३० एप्रिल पर्यंत जिल्ह्यात कोरोना उच्चांक गाठून शकतो अशी  शक्यता जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त करून जर “ब्रेक द चेन” ही मोहीम यशस्वी करायची असेल तर लग्न समारंभ व इतर ठिकाणी विनाकारण फिरणे  या गोष्टी टाळणे महत्त्वाचं असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींना आपल्या माध्यमातून आपण जनतेमध्ये ग्रामीण भागात याबद्दल जनजागृती करावी असे आवाहन केले.तसेच येत्या २ दिवसात १५ ते २० रुगण्वाहिका  उपलब्ध होणार असून तीन दिवसाचा लस पुरवठा संपून नवीण लस मागवण्यात येत असल्याचीही   माहिती  यावेळी  जिल्हाधिकारी  यांनी दिली.  यावेळी वित्त व बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, वनिता तांडेल, जि. प. सदस्य वैदेही वाढाण,  प्रकाश निकम, संदेश ढोणे,  जयेंद्र  दुबळा यांनी कोरोना बाबतीतील कोव्हीड केअर सेंटर,  डीसीएचसी  येथील समस्या प्रशासनासमोर मांडल्या. 
   मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्र काम करून कोरोना वर मात केली पाहिजे. सम्बन्धित उणीवा लोकप्रतिनिधी लक्षात आणून देतात आणि त्यांच्यामुळेच त्या प्रशासनाला समजतात. त्यामुळे निश्चितच या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी  प्रयत्न केले जातील. तसेच पोशेरी, रिव्हेरा व इतर   डी सी एच सी मध्ये   बोअरवेल  किवा  टँकर  च्या माधमातून जेथे पाण्याचा तुटवडा असेल तो दोन दिवसात  दूर केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी उपस्थित झाले होते.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी.ओ.चव्हाण देखील  यावेळी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...