Friday, April 9, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्रावर व परिसरात मनाई आदेश लागू

*महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्रावर व परिसरात मनाई आदेश लागू*                 
            पालघर(प्रतिनिधी)  दि.9 : महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपात्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, या परीक्षेच्या कालावधीमध्ये  परिक्षा केंद्रावर व परिसरात परीक्षा देणारे विद्यार्थी व परीक्षाविषयक कामकाज पाहणेकरिता नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशिर जमावास परिक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसरात रविवार दिनांक ११/०४/२०२१ रोजी ००.०१ ते २४.०० या कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे..                     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभरात महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपात्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, रविवार, दि.११/४/२०२१ रोजी सकाळी ०८.०० ते सायंकाळी ०१.०० या कालावधीत घेण्यात येत असून सदरची परीक्षा पालघर तालुक्यातील एकूण ०६ उपकेंद्रावर घेणार आहेत व सदरच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितना सूचना दिल्या असल्याचे .अपर जिल्हादंडाधिकारी किरण महाजन, यांनी सांगितले आहे.

 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपात्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, या परीक्षेच्या कालावधीमध्ये परीक्षा केंद्राचे परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलीफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणाहून गैरव्यवहार होवू नये म्हणून तसेच बेकायदेशिर जमाव जमून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या अपप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरुरीचे आहे.

 फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(१)(२)(३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पालघर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपात्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या १) व्टिकल स्टार हायस्कूल, चार रस्ता, मनोर रोड, पालघर, ता.जि.पालघर २) यशवंत चाफेकर महाविद्यालय पालघर, टेंभोडे, पालघर (प.), ता.जि.पालघर ३) श्री.सतु कदम हायस्कूल (जिवन विकास), बोईसर-पालघर रोड, ता.जि.पालघर, ४) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-A, ५) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-B, ६) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड पालघर, ता.जि.पालघर Part-C या परिक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी व परीक्षाविषयक कामकाज पाहणेकरिता नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशिर जमावास परिक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसरात रविवार दिनांक ११/०४/२०२१ रोजी ००.०१ ते २४.०० या कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...