*आमदार श्रीनिवास वनगा यांच्या कडून वैद्यकीय साहित्य भेट.*
(प्रतिनिधी)पालघर
पालघरचे शिवसेनेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी जे.जे.युनिट पथक,पालघर च्या माता बाल संगोपन केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट दिली,
पालघर येथील जे जे युनिट पथक येथे पालघर सह ग्रामीण भागातील गरीब,गरजू महिला भगिनी प्रसूती साठी उपचारासाठी येत असतात,या ठिकाणी काही शस्त्रक्रिया व इतर उपचार व कोविड काळातील साहित्याची आवश्यकता आहे असं समजल्यावर पालघर चे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी तातडीने शस्त्रक्रिया साठी लागणारे सर्जिकल हॅन्डग्लोज,रुग्णासाठी कोविड मास्क,आणि सॅनिटायजर आदी वस्तू आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन नवले यांच्या कडे हे साहित्य सुपूर्द केले,
यावेळी शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख श्री.राजेशभाई शाह,स्वीयसहायक निलेश राऊत उपस्थित होते,
यावेळी कोविड आजारात योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आमदार श्री. वनगा यांनी केली
No comments:
Post a Comment