Tuesday, April 6, 2021

वैतरणा रेल्वे पुलास धोका होणार नाही

*वैतरणा रेल्वे पुलास धोका होणार नाही*                                  पालघर (प्रतिनिधी)दि 6 : वैतरणा रेल्वे ब्रिज क्र.९२ चे पिलर आणि क्र. १६, १७ व १८ येथे दोन्ही बाजूने  १२ मी. वाळूरेतीचे अवैध उत्खनन झाल्याने रेल्वे पुलास धोका निर्माण झाल्याबाबत  कैलास मिना (IRSE),SR DEN NBCT मुंबई DRM ऑफीस रेल्वे विभाग यांनी पत्र पाठविले आहे.वैतरणा रेल्वे पुलास धोका होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.

रेल्वे विभागाचे पत्राच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक पालघर, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) मीरा भाईंदर, उप विभागीय अधिकारी पालघर व वसई यांना कारवाई बाबत कळविणेत आले आहे. तसेच रेल्वे विभागाने कळविल्यानुसार वैतरणा रेल्वे पुलास धोका होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत या कार्यालयाकडून सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रकरणी रेल्वे विभागाचे अधिकारी, महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...