शिक्षक पतपेढी ( जिल्हा परिषद ) २५ लाख ₹ , सानुग्रह अनुदान देणार का ?
पालघर ( हिरालाल लोखंडे ) महाराष्ट्र राज्यात अनेक शिक्षकांचा अकस्मात मृत्यू होत असून, त्या मृत शिक्षकाच्या कुटूंबाला सरकार महोदय, यांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत, मृत शिक्षकाच्या कुटूंबाला मिळत नाही. त्या कुटूंबातील प्रमुख व्यक्तीला रोजंदारी पध्दतीने मिळेल ते काम करून, आपल्या संसाराची गाडी चालवावी लागते. शिक्षकाच्या हितासाठी ( Z. P.) स्थापन झालेल्या शिक्षक पतपेढीने अश्या कुटूंबाला आर्थिक मदत करून, मदतीचा हात दिला पाहिजे. दुर्दैवाने मृत पावलेल्या शिक्षकाच्या कुटूंबाला शिक्षक पतपेढीने २५ लाख रूपये ( अक्षरी पंचवीस लाख रूपये मात्र ) सानुग्रह द्यावे अशी जोरदार पणे मागणी पालघर व ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद पतपेढी संघटनेतील अनेक शिक्षकाची मागणी आहे.
शिक्षक पतपेढी ही फ़क्त शिक्षकांना कर्ज देण्यासाठी आहे का ? , असे अंशदायी निवृत्ती वेतन धारकांचे सांगणे आहे. पालघर / ठाणे जिल्हयातील शिक्षक पतसंस्थेचे १,०००० ( अक्षरी दहा हजार ) सभासदत्व धारक नक्कीच आहेत. तरी अश्या पतसंस्थेला ( पतपेढीला ) सानुग्रह मदत देण्यासाठी काहीच हरकत नाही.
पुढील येत्या काळात शिक्षक पतसंस्था यांच्या निवडणूका येत आहे. त्यावेळेस आपल्या रास्त व न्याय - हक्कांच्या मागण्यासाठी डी. सी. पी. एस. धारक शिक्षक बहुसंख्येने शिक्षक पतसंस्थे समोर उपोषणास बसणार आहेत, त्या आधि शिक्षक पतसंस्था सन्मानित अध्यक्ष / उपाध्यक्ष /चिटणीस व संचालक मंडळ या सर्वांना , संवेदनशील प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे म्हणून म. रा. जुनी पेन्शन हक्क संघटना आग्रही असून, शिक्षक पतसंस्था निवडणुकीत या मुद्यावर आवाज उठवणार आहे. अशी माहिती जिल्हापरीषद शिक्षकांकडून मिळत आहे.
No comments:
Post a Comment