पालघर पोलिस दलाकडून रक्तदान शिबिर संपन्न
पालघर ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ४ एप्रिल २०२१ रोजी पालघर पोलीस ठाणे मार्फत व पालघर पोलीस दलाकडून रक्तदान शिबिर संपन्न झाले. संपूर्ण महाराष्ट्रात कोव्हिडा - १९ चा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या मुळे राज्यात रक्त कमतरता भासत आहे. या अनुषंगाने मा. श्री दत्तात्रेय शिंदे पोलीस अधिक्षक पालघर, मा. श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधिक्षक पालघर, श्री शैलेश काळे पोलीस उप अधिक्षक गृहपालघर, श्री विकास नाईक उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ एप्रिल २०२१ रोजी पालघर पोलीस ठाणे तर्फे लायन्स क्लब पालघर, पतंगशहा कुटीर रूग्णालयात - रक्तपेढी जव्हार, जे जे हॉस्पिटल रक्तपेढी मुंबई यांच्या सौजन्याने व पालघर पोलीस दल यांच्या सहमतीने आयोजित करण्यात आलेले
पालघर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री दशरथ पाटील यांनी पालघर परिसरातील पोलीस मित्र, ग्रामरक्षक दल, सागर सुरक्षादल, तसेच स्थानिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले, त्यामुळे या कार्यक्रमात २०२ रक्तदात्यांनी रक्त दान केले. या मध्ये ५९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बहुमुल्य सहभाग आहे.
पालघर पोलीस दला मार्फत खाली लिहिलेल्या तारखांना व दिलेल्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेली आहेत तरी रक्तदात्यानी सहकार्य करावे
१ ) दिनांक ६ एप्रिल २०२१ उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर टिमा हाॅल बोईसर.
२ ) दिनांक ८ एप्रिल २०२१ उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू, दशरथ माळी समाज हाॅल मसोली डहाणू ता, डहाणू
३ ) दिनांक १० एप्रिल २०२१ उपविभाग पोलीस अधिकारी जव्हार यांच्या मार्फत वाडा पोलीस ठाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेली आहेत.
रक्तदात्यांना पालघर पोलीस ठाणे यांच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा. श्री प्रकाश गायकवाड - अप्पर पोलीस अधिक्षक पालघर, श्री विकास नाईक - उप विभागीय अधिकारी पालघर - पालघर विभाग, श्री शैलेश काळे - पोलीस उप अधिक्षक गृह पालघर, श्री दशरथ पाटील प्रभारी अधिकारी पालघर ठाणे, श्री गजानन पडळकर - स.पो.निरीक्षक, श्री विनायक माने - पो. उप निरीक्षक, श्री अविनाश ढाकरे - पो.उप निरीक्षक, श्री सुधीर उबाळे - पो. उप निरीक्षक, श्री कदम - रा.पो.उप निरीक्षक, पोलीस अंमलदार यांनी केलेल्या जनजागृती व नियोजन यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. श्री दशरथ पाटील प्रभारी अधिकारी पालघर पो. ठाणे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment