Tuesday, March 2, 2021

पालघर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष ह्यांच्या आदेशावरून दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला

पालघर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष  ह्यांच्या आदेशावरून दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला
पालघर (प्रतिनिधी)
दिनांक 02/03/2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष *मा.सत्यजीत दादा तांबे* ह्यांच्या आदेशावरून आणि पालघर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष *कॅप्टन सत्यमभाई ठाकूर* ह्यांच्या परवानगीने पालघर येथे केंद्र सरकारच्या विरोधात  सातत्त्याने करत असलेल्या पेट्रोल,डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.  मोदीसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.त्याच बरोबर लवकरात लवकर ही दरवाढ कमी करून सामान्य जनतेची करीत असलेली फसवणूक थांबवावी अशी सूचना देण्यात आली.ही दरवाढ कमी झाली नाही तर पुढे हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा ह्या वेळीस केंद्र सरकारला देण्यात आला. 
ह्या वेळी पालघर विधानसभा अध्यक्ष कु.राहुल विजय राठोड , ओम साई मिञ मंडळ युवा अध्यक्ष केतन चव्हाण, बालुभाई प्रतिष्टन पालघर चे सचिव रूपेश राऊत ,  युवक काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...