Tuesday, March 2, 2021

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी 30 एकर जागा मिळावीपालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांची मागणी





शासकीय वैद्यकीय महाविद्यालया साठी 30 एकर जागा मिळावी
पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांची मागणी
प्रतिनिधी(पालघर)
नवनिर्मीत पालघर जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा असुन येथे सागरी, नागरी, डोंगरी अशी भौगोलीक रचना असलेला मुंबई लगतचा जिल्हा आहे. येथे तारापूर अणु उर्जा प्रकल्प या सह अनेक छोटे मोठे उद्योग, बोईसर, पालघर तलासरी, वाडा, वसई, या ठिकाणी औद्योगीक वसाहती आहेत. तसेच जिल्हा मुख्यालय असल्याने पालघर तालुका झपाट्याने नागरीकरण होत आहे. 
येथील आरोग्य यंत्रणा या पार्श्वभुमीवर सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी वैद्यकिय महाविद्यालयास तातडीने मंजुरी मिळणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयास मंजुरी असुन त्याचे काम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयासह शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी २५ एकर जागा आरक्षीत व मागणी संदर्भात मा. संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांनी दि. १८/०१/२०२१ रेाजी चे क्र.संवैशिवसं/नवीन/शावैम/पालघर/न.क्र.२२२/२०१८/२०२१/१-अ. संदर्भीय पत्रानुसार मा. जिल्हाधिकारी पालघर यांना पत्र दिले आहे.    त्याअनुषंगाने आमदार श्रीनिवास वनगा यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.अमित देशमुख यांच्या कडे पत्राद्वारे वैद्यकीय महाविद्यालया करीता ३० एकर जागा मागणी केली आहे.
 पालघर जिल्ह्याचे भविष्यातील वाढती लोकसंख्या व शहरीकरण लक्षात घेवून नविन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास तात्काळ मंजुरी व त्यासाठीसुमारे २५ ते ३० एकर जागा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी वैयक्तिक पाठपुरावा करीत असल्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...