पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर तालुक्यातील मौजे मुरबे येथील अंदाजे सहा कोटी रूपये खर्च करून बंदर विकासासाठी, राष्ट्रीय कृषी विकास योजना नाबार्ड, मत्स्यव्यावसाय खाते, पालघर जिल्हा नियोजन समिती तर्फे कामे सूरू करण्यात आली असून त्या कामाची पाहणी मा, खासदार श्री राजेंद्र गावित साहेब
यांनी १ मार्च २०२१ रोजी केली. राष्ट्रीय कृषी विकास योजना व नाबार्ड अंतर्गत अंदाजे ₹ ४,६५,००००० /- अक्षरी चार कोटी पासष्ट लाख रूपये कामास मंजूर करण्यात आलेला आहे.
मुरबे किनारा अॅपरोच रोड लांबी साधारणपणे ६०० मिटर, रूंदी ५ मिटर काम प्रगती पथावर असून, बंदर किनारी उतरता धक्का लांबी ६५ मिटर, रूंदी ५ मिटर काम पुर्ण करण्यात आले आहे. बंदर किनारी बोट यार्ड लांबी ४० मिटर रुंदी १५ मिटर काम पुर्ण झालेले आहे. तर उर्वरित ३५ मिटर लांब व १५ मिटर रुंदीचे काम प्रगती पथावर आहे. बंदर किनारी बोट बसिन ४० मिटर लांब व २० मिटर रुंद तसेच ३५ मिटर लांब, व २०मिटर रुंद काम चालू आहे.
मत्स्य व्यवसाय खाते व जिल्हा नियोजन समितीतून अंदाजे ४० लाख रूपयांची कामे, बंदर विकासाची सुरू असून, नेट वेडिंग शेड उघडा निवारा काम प्रगतीपथावर आहे. उतरता धक्का जेटी काम पुर्ण झालेले आहे.
वरील कामे बघून खासदार साहेबांनी समाधान व्यक्त केले. गावकर्या सोबत बोलताना सांगितले मि मच्छिमार बंदरांच्या विकासासाठी प्रयत्नशिल असून सातपाटी गाव, मुरबे गाव, वसईतील पांचुबंदर, डहाणूतील धाकटा डहाणू तसेच इतर मच्छिमार गावे आहेत त्या गांवाच्या बंदर विकासासाठी मी सतत प्रयत्न आहे व यापुढेही राहणार आहे. खासदार साहेब सोबत श्री केदार काळे शिवसेना लोकसभा सहसमन्वयक, श्री सचिन पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, श्री जितेन मेहर पंचायत समिती सदस्य, श्री राकेश तरे सरपंच मुरबे, श्री काशिनाथ पाटील उत्कर्ष मच्छिमार सोसायटी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तुषार वाडीकर, मुक्ताताई देव, उर्मिला पाटील, कमळाकर तरे, कैलास पाटील, साजिद शेख, राज तरे, शिवदास तरे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक आदि उपस्थित होते. साहेब नेहमीच मदतीसाठी धावून येत असल्याने गावकर्यांनी साहेबा सोबत सर्वाचे आभार मानले
No comments:
Post a Comment