Saturday, March 6, 2021

थकबाकी मुक्त शेतकरी बांधवांचा " महाराष्ट्र शासन उर्जा विभाग व्दारा सन्मान.

" थकबाकी मुक्त शेतकरी बांधवांचा " 
महाराष्ट्र शासन उर्जा विभाग व्दारा सन्मान.  ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सफाळे ग्रामपंचायत सभागृहात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उपविभाग सफाळे व्दारा कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० व्दारा, विद्युत शेतीपंप धारक शेतकर्‍यांचा मेळाव्यात ५० % टक्के रक्कम एकदाच भरून ५० % टक्के सवलतीचा लाभ घेतलेल्या अश्या एकुण १२७८ शेतकरी बांधवांचा " महाराष्ट्र शासन " उर्जा विभाग व्दारा महावितरणच्या कर्मचारी वर्गाकडून थकबाकी मुक्त शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन " सन्मान पत्र " व  " प्रमाण पत्र " देऊन त्यांना गौरविण्यात येत आहे. श्री मुकुंद देशमुख कार्यकारी अभियंता सफाळे विभाग यांनी वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने " शेतकरी सन्मान " कार्यक्रम राबविण्यात आल्याने कृषीपंप धारक शेतकरी वर्गाकडून श्री देशमुख साहेब व विज कर्मचारी वर्गाचे हार्दिक अभिनंदन करीत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...