Friday, March 5, 2021

श्री निलेश सांबरे - पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष , ठाणे जिल्हा बॅक निवडणूकीच्या रिंगणात !

श्री निलेश सांबरे - पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष , ठाणे जिल्हा बॅक निवडणूकीच्या रिंगणात !  ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ३ मार्च २०२१ रोजी पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री निलेश सांबरे यांनी दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी. दि. ठाणे जिल्हा  सहकारी बँक निवडणूक कार्यालय ठाणे येथे जाऊन  निवडणूकीसाठी फाॅम दाखल केला असल्याने, प्रस्थापितांच्या समोर एक आव्हान दिले आहे. 
    श्री निलेश सांबरे मागील बारा वर्षा पासून " जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या " माध्यमातून शिक्षण, आरोग्य,  शेती, महिला - सक्षमीकरण, स्पर्धा परिक्षा, वाचनालये, मोफत पोलीस भरती प्रशिक्षण, रुग्णवाहिका आदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, सहकार क्षेत्रातील फायदे,  सरकारी व सहकारी योजना सर्वसामान्य -  जनते पर्यंत पोहचविण्याच्या एकमेव उद्देशाने व सहकार शेत्रात  क्रांती घडविण्यासाठी कार्य करीत असल्याचे मी कार्य करीत आहे असे सांबरे यांचे सांगणे आहे. 
        निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करताना श्री निलेश सांबरे सोबत केदार चव्हाण, सौ, मोनिका पानवे, पिंका पडवळे, संदेश ढोणो, अजीत जाधव, पंकज पवार,  जावेद खान, कैलास भोईर, अरविंद देशमुख आदी मान्यवर ठाणे येथे उपस्थित होते. निवडणूक ३० मार्च २०२१ रोजी होणार आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...