Sunday, March 7, 2021

नाशिक इगतपुरी शहरातील मुख्य मार्ग जुना आग्रा रोड दुरुस्तीसाठी आमदार हिरामण खोसकर यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टी इगतपुरी यांच्यातर्फे निवेदन.

नाशिक इगतपुरी शहरातील मुख्य मार्ग जुना आग्रा रोड दुरुस्तीसाठी आमदार हिरामण खोसकर यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टी इगतपुरी यांच्यातर्फे निवेदन.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

इगतपुरी शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ते गिरणारे मुख्य मार्ग जुना आग्रा रोड येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना व वृद्धांना मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.
मागील काळात हा रस्ता माजी खा.समीर भुजबळ यांच्या निधीतून तयार करण्यात आलेला होता तरी आज या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे तरी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात नागरिकांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत म्हणून  इगतपुरी तालुक्याचे लोकप्रिय आमदार हिरामण खोसकर यांना इगतपुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळी महेश नाना शिरोळे जिल्हा उपाध्यक्ष. वसीम सय्यद शहराध्यक्ष राष्ट्रवादी. मिलिंद हिरे माजी नगरसेवक. महेश पगारे, जुबेर पठाण. अभय पार्टे,मोना भडांगे,विजय पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...