पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार
बंद करण्याचे आदेश खालील अटी व शर्तीवर उठविण्यात येत आहे
पालघर (प्रतिनिधी) दि. 4 :.- कोरोना विषाणुच्या (कोबिड-१९) प्रसाराचे माध्यम पाहाता, सदर विषाणुची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/ इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेता पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार दिनांक २५/०२/२०२१ ते पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.आणि ज्याअर्थी, सदरहू आठवडी बाजार बंद केल्याने व्यवसाय, रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्था यांचेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निर्देशास आल्याने सदरहू आठवडी बाजार बंदी उठवणे आवश्यक असल्याची माझी धारणा झाली आहे. त्याअर्थी, मी डॉ माणिक गुरसळ, जिल्हादंडाधिकारी पालघर मला बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५(ग)(ग) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उपोद्घातातील अ.क्र.२ अन्वये पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार बंदकरण्याचे आदेश खालील अटी व शर्तीवर उठविण्यात येत आहे. आठवडी बाजारातील विक्रते व ग्राहक यांनी मास्क घालणे, Handwash / Sanitizationकरणे, शारीरिक अंतर (Physical Distance) व कोविड-१९ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल. सदरचा आदेश आज दि.०४/०३/२०२१ जिल्हाधिकारी यांनी दिला आहे
No comments:
Post a Comment