वाडा ( हिरालाल लोखंडे ) पालघर जिल्हयातील वाडा तालुक्यातील अनेक भागात घनदाट वाढलेल्या जंगलातील, मौल्यवान किंमतीच्या वृक्षांची लाकूड चोरी संघटीत पणे होत असून, वृक्ष तोड करून वनजंगल संपत्तीचा आपल्या फायद्यासाठी नाश करीत, तांडवनृत्य करीत कसल्याचे दिसत आहे. त्यांना कायद्याची भिती दिसुन येत नाही. कारण स्वतःच्या फायद्यासाठी ते काहितरी करण्यासाठी धडपड करणारच
दिनांक १ मार्च २०२१ रोजी वनविभागाचे कर्मचारी पालसई भागातील बोरांडा फाटा विभागात रात्रीच्या गस्तीवर असताना सकाळी सुमारे ५ - ३० च्या दरम्यान एक टाटा पिकअप ( विना नंबर प्लेट असलेली ) कुडूस फाटा मार्गे कंचाडकडे संशयास्पद जाताना दिसुन आली असता, श्री व्हि, एल, धुरी - श्री आय, पी, शिंदे - एस, बी, ठाकरे सर्व वनरक्षक व श्री ज्ञानेश्वर आकरे वनविभाग वाहन चालक यांनी संशयास्पद चाललेले वाहन पिकअप थांबवून तपासणी केली असता, वाहनांमध्ये खैर प्रजातीचे दोन ओंडके व खैर प्रजातीच्या लाकडाची साल तसेच भुसा दिसुन आला असता, वाहन चालक व त्यांचा साथीदार यांच्या कडे विचारणा केली असताना असमाधानकारक माहिती व उजवा - उडविची उत्तरे दिली असताना, आरोपींना चौकशी साठी ताब्यात घेऊन, त्यांचे व विरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ( २ ) ( ब ) ४२, ५२, ६५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, जप्त करण्यात आलेले वाहन व त्यातील मुद्देमाल याची अंदाजे किंमत २,००००० /- ₹ अक्षरी दोन लाख रूपये सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, वाडा,जिल्हा पालघर, कोर्टात हजर केले असताना ०३ मार्च २०२१ पर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे.
वरिष्ठ वन अधिकारी जव्हार यांच्या अधिपत्याखाली व श्री एच, व्ही सापळे वन शेत्रपाल वाडा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जाधव, श्री सोनवणे, श्री केंद्रे, श्री सपकाळ, श्रीमंत धुरी सर्व वनरक्षक वाडा विभाग पुढील तपास करीत आहे. या पुर्वी फेब्रुवारी महिन्यात अश्याच प्रकारे खैराची चोरटी वाहतुकीच्या करणार्या दोन गाड्या पकडल्यानंतर कारवाई सुरू आहे.
No comments:
Post a Comment