*🔺वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी सुचनांची गांभीर्याने घेतली दखल...🔻*
वाडा (सिद्धार्थ सांबरे)वाडा ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड लसीकरण करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी सोबत चर्चा करून सूचना केल्या होत्या...
याबाबत *वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक* यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले होते..
त्यानुसार केलेल्या सूचनांचे *वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भडांगे सर* यांनी गांभीर्याने दखल घेऊन आज *वाडा ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड लसीकरण* करण्यास येणाऱ्या *नागरिकांची गैरसोय व संभ्रम* निर्माण होणार नाही याची काळजी घेत *उत्कृष्टपणे नियोजन करून बसण्यासाठी आसन व्यवस्था देखील केली आहे...*
व मंडप व्यवस्था देखील करण्यात येणार आहे...
याबद्दल *वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भडांगे सर* यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..जनता करीत आहे
तसेच *जेष्ठ नागरिक* यांना संपूर्ण दिवसभर
*(सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)* लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे असेही *वैद्यकीय अधीक्षक डॉ.भडांगे सर* यांनी सांगितले आहे..
दरम्यान, *वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भडांगे सर* यांनी केलेल्या *नियोजनबद्ध कार्यक्रमा बद्दल मी मनःपूर्वक धन्यवाद देतो...*👏🏻👏🏻
-------------------------------------------------
*कोव्हीड लसीकरण करताना*
*🔸महत्वाच्या सुचना व काळजी🔹*
*1)* कोव्हीड लसीकरण करण्यासाठी येताना शक्यतो *ऑनलाइन द्वारे नोंदणी करावी* व confirmation मेसेज आल्या नंतर किंवा तसा काही Reply आल्यानंतरच ठरलेल्या दिवशी व वेळेत लसीकरण केंद्रावर जावे...
*2)* उन्हाचा वाढता त्रास लक्षात घेता शक्यतो लसीकरणाचा लाभ हा *जेष्ठ नागरिक* यांनी *सकाळी ९ ते ११:३० वाजेपर्यंत* तसेच *दुपारी ३:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत* घ्यावा असेही आवाहन वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे...
*3)* कोव्हीड लसीकरण करताना येण्यापूर्वी प्रवासात थकवा येणार नाही याची काळजी घ्यावी...
*4)* लसीकरण केंद्रावर येताना सोबत पाण्याची बॉटल- टिफिन घेऊन यावे..
*5)* तोंडाला मास्क लावावेत..
*6)* लसीकरण केंद्रावर आल्यानंतर हात- तोंड स्वच्छ पाण्याने धुवावेत..
*7)* आसनावर अर्थात खुर्च्यांवर बसल्या नंतर व आधी देखील तोंडाला मास्क लावून ठेवून सुरक्षित अंतरावर बसावे (सोशल डिस्टन्स नियम पाळावेत..)
*8)* कोरोना संदर्भातील नियम पाळावेत..
*9) जेष्ठ नागरिक* यांना काही त्रास असल्यास *( उदा. ताप, सर्दी, खोकला,ब्लडप्रेशर, हृदय विकार, डायबेटीस किंवा गंभीर आजार* असल्यास) पहिल्यांदा *आरोग्य तपासणी* करावी...
*10)* जे आजारी किंवा इतर आजारावर उपचार घेणारे नागरिक कोव्हीड लसीकरणासाठी जात असतील तर त्यांनी त्यांच्या *फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानेच* तसेच *सोबत मेडिकल फाईल* घेऊन लस घेण्यासाठी जावे...
*11)* उन्हाचा त्रास होऊ नये किंवा उन्हातून आल्यास लगेचच लसीकरण न करता पहिल्यांदी १० ते १५ मिनिटां पर्यंत शांत एकाच जागी बसुन राहावे..
*12)* तसेच भरपूर ORS किंवा ग्लुकोज पावडर पाणी किंवा ज्यूस प्यावे.
*13)* लसीकरण करताना येण्यापूर्वी भरपूर खाऊन यावे... (शक्यतो तेलकट खाणे टाळावे)
*14)* लसीकरण झाल्यानंतर पुन्हा किमान ३० मिनिटे बसून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली राहावे...
*15)* लसीकरणानंतर काही *Reaction किंवा त्रास जाणवू* लागल्यास डॉक्टरांना किंवा तेथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगून पुढील औषधोपचार करावे...
*16)* लसीकरण करताना येताना सोबत आपल्या मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील एका सदस्याला सोबत घेऊनच यावे...
(शक्यतो एकटा येऊ नये.)
*17)* आपल्या कुटुंबातील सदस्यांचा संपर्क / मोबाइल नंबर आपल्याकडे किंवा आपल्या मोबाईलमध्ये डाइल ( Dail) करून ठेवावा.. जेणेकरून काही त्रास जाणवल्यास त्यांना आपण तात्काळ फोन करून कळवू शकतो... किंवा अन्य उपस्थित असल्यास त्यांना फोन करायला सांगू शकतो...
*18)* लसीकरण झाल्यानंतर घरी जाताना तसेच घरी गेल्यानंतर काही त्रास तर होत नाही ना..?
याची पूर्णपणे खात्री करावी...
*19)* घरी गेल्यावर लसीकरणाचा काही त्रास जाणवु लागल्यास जवळच्या *प्राथमिक आरोग्य केंद्र,* ग्रामीण रुग्णालय किंवा फॅमिली डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून सल्ला घ्यावा किंवा जावे...
*20)* लसीकरण झाल्याची नोंद आपल्या डायरी किंवा कॅलेंडरवर करावी...
धन्यवाद...👏🏻
*(जनहितार्थ.....)*
No comments:
Post a Comment