भारतीय बौध्द महासभा,
बाईसर शाखेची नवीन कार्यकारिणी ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ मार्च २०२१ रोजी मौजे उमरोळी बौध्द आळी ता,जि पालघर येथे आयु, श्रीपाद शेलार भारतीय बौध्द महासभा पालघर तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर शहर व ग्रामीण भाग यांची सांगड घालण्यासाठी १४ गावांना एकत्र घेऊन, नवीन तरूणांना १०० टक्के संधी देऊन, धम्मकार्य जोडण्याची महत्वाकांक्षी योजनेसाठी बनविण्यात आली आहे.
अॅड, आयु, अजिंक्य म्हस्के या कार्यकारिणीचे अध्यक्ष आहे. ते दलित पँथरचे माजी युवा अध्यक्ष, गीतकार, विद्रोही कवी, ग्रामपंचायत पांचाळी सदस्य आहेत.आयु, किरण मोरे कोषाध्यक्ष. आयु ,धिरज लोखंडे महासचिव, आयु , चेतन जाधव संरक्षण उपाध्यक्ष, आयु, रूपेश लोखंडे सचिव, आयु राहुल नाईक प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, आयु करण राऊत प्रचार पर्यटन सचिव, आयु कुशल जाधव अॅडीटर, आयु कौशल जाधव कार्यालयीन सचिव, संघटक पदी सिध्दार्थ कुर्ले संकेत दिवे सिध्दार्थ वाघमारे नियुक्ती, आयु रंजना मोरे, आयु जयमाला मोरे महिला संघटक पदी, नियुक्ती करण्यातआललेली आहे .
कार्यक्रमांची सुरूवात दिवंगत भगवान जाधव यांच्या पवित्र स्मृतीला श्रध्दांजली देऊन करण्यात आली. या प्रसंगी दिपक लोखंडे पालघर तालुका महासचिव ,रूपेश राऊत कोषाध्यक्ष, प्रदीप जाधव संस्कार उपाध्यक्ष, दत्ताराम गायकवाड संस्कार सचिव, सुमनताई लोखंडे केंद्रीय शिक्षीका, शामराव खरात पालघर संघटक, सुनिल शेलार एकनाथ काळे अशोक शेलार सफाळे विभाग तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते पुढील वाटचाली साठी मंगलमय शुभेच्छा, वरील माहिती रूपेश रमेश राऊत दातिवरे यांच्या कडुन प्राप्त झाली आहे
No comments:
Post a Comment