ग्रामपंचायत कुडण ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी!
ग्राहक संरक्षण फाउंडेशन चे .जिल्हा अध्यक्ष .मिलींद चूरी (प्रतिनिधी)दि.३०/०८/२०१८ च्या माहिती अधिकार अर्जाची माहिती २ वर्षांनंतर दि.२६/०८/२०२० रोजी प्राप्त माहितीच्या आधारे गट विकास अधिकारी पालघर पंचायत समिती यांना दि.०२/०९/२०२०रोजी पत्र देऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे दप्तरामध्ये प्रचंड अनागोंदी कारभार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते त्यामुळे आपण सदर ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीसाठी अधिकारी नियुक्त करून अहवाल सादर होईपर्यंत या ग्रामसेविकेचे निलंबन व चौकशी करून दोषींवर कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी असे विनंती करून सुद्धा कोणतेही चौकशी केली नसल्याचे माहिती अधिकार अर्ज ला दिलेल्या उत्तरातून समजते.
कुडण ग्रामपंचायत २०१७-१८ या वित्तीय वर्षाची सामान्य रोकड वही च्या माहिती अधिकार मध्ये प्राप्त झालेल्या छायांकित प्रतीच्या आधारे दिनांक २१/०६/२०१७ रोजी कुडण ग्रामपंचायत ग्रामसेविका पदाचा पदभार सौ. धनश्री धर्मेंद्र संख्ये यांनी स्वीकारला. परन्तु १८/०४/२०१७ ते ०३/०६/२०१७ या कालावधी सदर दप्तर पदभार स्वीकारण्याआधीच सदर ग्रामसेविका यांनी त्यांच्या सही शिक्कानीशी पूर्ण केल्याचे धक्कादायक बाब निदर्शनांत आली आहे. व पुन्हा त्यांनी हा आपला गुन्हा मिटवण्यासाठी सदर सही खोडाखोड करून पुन्हा त्या काळात पदावर असलेल्या ग्रामसेवक यांची सही घेऊन या ग्रामसेवकांनी शासकीय दस्तऐवजामध्ये फेरबदल केला आहे. हा सर्व झालेल्या प्रकार बाबत ग्रामसेवक यांनी फेरबदल केलेल्या वहीच्या छायांकित प्रती त्या अर्जासोबत जोडल्या आहेत. सदर बाबत या कागद पत्रावर सही असणाऱ्या ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करून तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर याच्या कडे केली आहे.
No comments:
Post a Comment