सफाळे: दातिवरे शिक्षण संचलित संस्थेच्या दातिवरे येथील दातिवरे इंग्लिश हायस्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री रविंद्र ठाकूर सर होते. प्रमुख अतिथी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका डॉ स्मिता सुधीर माळवदे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यीनींना मार्गदर्शन करताना गुड टच ब्याड टच हे आपल्याला होणारे र्स्पश याबाबत जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन केले. व विद्यार्थ्यीनींना त्यांच्या कडुन वह्या व सँनेटरी पँड भेट देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.सी.राठोड यांनी प्रास्ताविकात जागतिक महिला दिन २०२१ ची थीम " *महिला नेतृत्व* *कोरोना - १९"* माहिती कथन केली. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रविंद्र ठाकूर यांनी " स्त्री आणि पुरुषां मध्ये समानता आणणे या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी शाळेतील शिक्षिका मनिषा कुलकर्णी व प्रितम राऊत यांचाही गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षक सुजय वसावे, संजय भोपी उपस्थित होते. खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिल ठाकूर सरांनी केले तर प्रितम राऊत यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment