Tuesday, February 2, 2021

रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यासाठी वाहतुकीत बदल


रस्त्याचे क्राँक्रीटीकरण करण्यासाठी वाहतुकीत बदल

पालघर (प्रतिनिधी)दि. 12 :- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हनुमान मंदीर चौक हा रस्ता मुख्य वर्दळीचे ठिकाण असल्याने वैयक्तीक व सरकारी कामकाजासाठी बोईसर, मुंबई व गुजरात बाजुकडून येणारे वाहने याच रस्त्याने पालघर शहरात येत असतात. सदर रस्त्याचे दुतर्फी मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्ती असून वाणिज्य गाळे व गोडाऊन आहेत. तसेच याच रस्त्या लगत एस. टी. बस डेपो व दळणवळणाचे इतर वाहनांची वाहनतळे आहेत. त्यामळे सदरचा रस्ता 75 दिवसांचे कालावधीत पुर्णपणे वाहतुक सेवा बंद न करता, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हनुमान मंदिर चौकाकडे व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून ते देविशा रोड - पाचबत्ती ( हुतात्मा स्मारक ) कडे अशी एकेरी ( वनवे ) वाहतुक सेवा चालु ठेवण्यात येणार आहे.
नागरीकांनी वाहतूकीसाठी पुढील प्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा
छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून हनुमान मंदिर चौकाकडे जाणारी एकेरी वाहतुक, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून देविशा रोड - पाचबत्ती ( हनुमान स्मारक ) कडे जाणारे एकेरी वाहतुक, पालघर शहर व रेल्वे स्टेशन आणि इतर मार्गाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतुक हि पालघर रेल्वे स्टेशन ते पाचबत्ती ते जगदंबा नाका अथवा माहिम वळण व तेथून आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे सदर प्रकरणी दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून ते दिनांक 09 जानेवारी 2020 संध्याकाळी 06.00 वाजेपावेतो सर्व प्रकारच्या वाहनांस एकेरी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने,  पोलीस विभागामार्फत परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 07.00 वाजेपासून ते दिनांक 09 जानेवारी 2020 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे डॉ.कैलास शिंदे जिल्हादंडाधिकारी, पालघर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...