Tuesday, February 2, 2021

जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क शिबीराचे आयोजन

जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क  शिबीराचे आयोजन                                      पालघर (प्रतिनिधी)दि. 02 : जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर या कार्यालया मार्फत केंद्र पुरस्कृत अस्कॅड योजने अंतर्गत "जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क या एक दिवशीय शिबीराचे आयोजन दि. ०८/०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचायत समिती सभागृह पालघर येथे करण्यात आले आहे.                                          शिबिराचे बोध वाक्य 'स्वस्थ पशु खुशहाल, किसान उत्पादक पशु संपन्न किसान आहे. त्यानुसार शिबिरामध्ये मान्सूनपूर्व लसीकरण, लसीकरणाचे महत्व व घोड्यामधील ग्लंडर(GLANDAR) आजार, राज्यात नव्याने आढळून आलेले रोग / LSD, ग्लंडर(GLANDAR), विविध रोगप्रादुर्भाव नियंत्रण, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, लाळ खुरकुत रोगाचा प्रसार लक्षणे,उपचार लसीकरण Tagging व नोंदणी, सांसर्गिक व संक्रमित रोगांचे प्रतिबंध अधिनियम 2009, जनावरांपासून पशुपालकांना होणारा आर्थिक दृष्ट्या महत्वाचा ब्रुसेला रोगाचा प्रसार , लक्षणे उपचार, लसीकरण तसेच बडर्ड फ्लू रोगाचा प्रसार, लक्षणे , जैविक सुरक्षा बाबत माहिती या विषयावर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील पशुपालकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...