संघाचे जेष्ठ स्वयंसेवक " दादा " विलीन. सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २ फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक श्री दिनकर गणेश पंडित उर्फ दादा यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे जन्म गाव रत्नागिरी तालुक्यात असले तरी पालघर जिल्ह्यात नोकरी निमित्त बदली होऊन आल्यानंतर एसटी महामंडळाच्या पालघर कार्यालयातच सेवानिवृत्त होऊन आपले पुढील आयुष्य पालघर तालुक्यातील सफाळे येथे कार्यरत केले.
दादा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवार सफाळे -- एक आदर्श व्यक्तिमत्व होते, संघ हेच जिवन व हाच त्यांचा परीवार होता. पालघर जिल्ह्यातील अनेक हेमंत शिबिरातून मेसची ( जेवणाची ) जबाबदारी स्वतः घेत कारण, मेहनत करण्यासाठी क्षमता - जिद्द तरूणांना लाजवेल अश्या प्रकारे त्यांचा कडे होती. महिला बालकल्याण अधिकारी त्यांना नमन करीत, कारण त्यांचे आचार - विचार - वागणूक वंदनीय अशीच होती. वसई मधे त्याना " समाज सेवक " पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल. तर सफाळ्यात " जानकी राम न्यास व्दारा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलेले.
दादानी सुमारे चोवीस - पंचवीस वर्ष पुर्ण वेळ संघपरीवारासाठी दिलेला, वनवासी कल्याण आश्रम रत्नागिरीत यथे दोन ते तिन वर्ष कार्य, वनवासी कल्याण आश्रम नाशिक येथे दोन ते तिन वर्ष पुर्ण वेळ देऊन कार्य केले. सफाळे येथे विश्व हिन्दू परिषद व जानकी राम न्यास आश्रमात सतत एकोणीस वर्ष अविरहित व्यवस्थापक म्हणून कार्य केले. अल्पशा आजाराने सर्वाना सोडून अनंतात विलीन झाले.त्यांच्या पश्चात दोन नांती असून शेवटच्या श्वासापर्यंत दादा संघमय जिवन जगले. दादाना भावपूर्ण श्रध्दांजली.
No comments:
Post a Comment