निषेध निषेध निषेध ?
इंधन दरवाढीचा निषेध ( हिरालाल लोखंडे ) केंद्र सरकारच्या धोरणामुळे, वाढलेल्या इंधन दरवाढीचा सर्व सामान्य जनतेचा, दर महिन्याचा घर खर्च बजेटमध्ये ठेवणे जिकरीचे होत आहे, इंधन दरवाढीचा प्रभाव मुळे सतत भाववाढ होत आहे, घरगुती गॅस सिलिंडर च्या किंमतीत भाववाढ दरमहा होत आहे. कोव्हिडा १९ च्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, तरीही " आई खावू घालीना बाप भिक मागू देईना " अश्या स्थिती अनेक कुटूंबांची झालेली आहे. तरी इंधन दरवाढीचा आलेख वरवर चढत आहे
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेने तर्फे शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पालघर हुत्तात्मा स्तंभा जवळ शिवसैनिकांनी एकत्र होऊन केंद्र सरकारचा निषेधार्थ घोषणा देऊन, निवासी उपजिल्हाधिकारी श्री नवले साहेब यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी मा. श्री राजेशभाई शहा -- मा श्री वसंतभाई चव्हाण पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख, मा श्री श्रीनिवासजी वनगा साहेब आमदार,पालघर विधानसभा, सौ भारती ताई कामडी - पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा, पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती ताई मेहर, आदी, तसेच सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी , पदाधिकारी, महिला आघाडी ,युवासैनिक उपस्थित होते
No comments:
Post a Comment