पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होत चालले असले तरी हि समस्या अजूनही कायम असल्याने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जव्हार आणिमोखाडा तालुक्यांचा सपत्निक दौरा करत पालघर जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला. शासकीय उपाय योजनांच्या पुढे जाऊन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दत्तक पालकत्व चा एक भाग म्हणून SAM श्रेणीतील दत्तक घेतलेली बालके श्रेया काशिनाथ भाम्बेरा व निर्मला मोहन शिंदे यांची भेट घेऊन त्यांना फळे व अन्नधान्य कित वाटप करण्यात आले. यावेळी मु.का.अ यांनी कुपोषित बालकांच्या पालकांची भेट घेऊन कुपोषित राहण्याची करणे लक्षात घेऊन समुपदेशन करण्यात आले.
सालीमठ यांनी आपल्या दौऱ्यात जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि मोखाडा कुपोषणमुक्त अंगणवाडी सेविकांचा गौरव केला. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, मोखाड्याच्या सभापती सारिका निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास प्रवीण भावसार ,आरोग्य अधिकारी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका कुपोषित बालकाचा वाढदिवस मु.का.अ.यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी सिद्धाराम सालीमठ यांनी वाळवंडा, जामसर, मोरांडा, या ठिकाणी भेटी दिल्या वाळवंडा येथील NRC पोषण पुनर्वसन केंद्रास भेट दिली यावेळी प्रत्यक्ष मुलाचे वजन व उंची तपासले. त्याप्रमाणे रेकॉर्ड तपासणी केली व कमी वजनाची बालके, अति तीव्र कुपोषित, अतिकुपोषित यांची माहिती घेतली. सतत कुपोषित असण्या बाबतची सामाजिक, आरोग्य, विषयक कारणे अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांच्याकडून जाणून घेतले गर्भवती व स्तनदा मातांची भेट घेऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण, लसीकरण, पोषण तसेच अमृत आहार योजनेअंतर्गत देण्यात येणारा आहार, अंगणवाडी केंद्रातील तयार करण्यात आलेले किचन गार्डन यांची माहिती घेतली.
प्रत्यक्ष बालकांच्या घरी जाऊन पालकांच्या अनुपस्थितीत बालकांना आहार कसा दिला जातो व त्यांची कशी काळजी घेतली जाते, त्यांच्या घरात अन्नधान्याची उपलब्धता याबाबतीतील माहिती मु.का.अ यांनी जवळून जाणून घेतली.
वाळवंडा उपकेंद्रास भेट दिली असता आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत यांनी समाधान व्यक्त करून उपकेंद्राच्या आवारामध्ये रिकामी असलेल्या जागेवर किचन गार्डन, करून येणाऱ्या गर्भवती व स्तनदा मातांना फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.
जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील बाल उपचार केंद्र मध्ये उपचार घेत असलेल्या बालकांची परिस्थिती जाणून श्रीमती सालीमठ यांच्या हस्ते किट वाटप केले.प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून बाह्य रुग्णांशी चर्चा केली. वीटभट्टी वरील पाच मुलांच्या जेवणाची व राहण्याची पाळणा घराप्रमाणे व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा पिरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्या सुरेखा थेतले उपस्थित होत्या.मोखाडा मधील NRC व मोरांडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील CTC भेट देऊन किट वाटप केले.हिरवे गावात भेट देऊन नाविन्यपूर्ण स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली.
No comments:
Post a Comment