*दातीवरे, कोरे,मथाणे व चटाळे गावांना पर्यटन विकास यादीत समाविष्ट करण्याची सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत यांची मागणी*,
प्रतिनिधी(पालघर)
दातीवरे येथील सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.निलेश राऊत यांनी सफाळे पश्चिम परिसरातील दातीवरे,कोरे,मथाने व चटाळे या गावांना जिल्हा पर्यंटन यादीत समाविष्ट करून विकास निधी मिळावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार मा.श्रीनिवास वनगासाहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.राजेशभाई शाह व मा.जि. प.अध्यक्षा व मा.जिल्हाधिकारी,पालघर यांच्याकडे केले आहे,त्याबाबत त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला असून पाठपुरावा चालू केला आहे,
याभागतील विकास व रोजगाराच्या निर्मिती साठी पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास निधी पण उपलब्ध होऊ शकतो व पर्यटक वाढल्यास गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली,मागे एडवन,वेडी व अंबोडे या गावांना देखील पर्यटन स्थळ म्हणून मान्यता व निधी मिळवून घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला होता,
No comments:
Post a Comment