Friday, January 8, 2021

शिक्षकांच्या प्रश्नाची व शैक्षणिक समस्यांची सखोल जाणं असणारे दत्ता ढाकणे यांची सरचिटणीस पदी निवड

शिक्षकांच्या प्रश्नाची व शैक्षणिक समस्यांची   सखोल  जाणं असणारे दत्ता ढाकणे यांची सरचिटणीस पदी निवड 
सफाळे (हिरालाल लोखंडे)दि.8 (प्रतिनिधी द टिचर्स व्ह्यूज). शिक्षकांच्या प्रश्नांची व शैक्षणिक समस्यांची सखोल जाण असणारे जि.प.शाळा करवेलपाडा ता.पालघर येथिल उपक्रमशील शिक्षक दत्ता ढाकणे यांची कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पालघर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. 
      दत्ता ढाकणे-बावीकर  हे मागील बारा वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विविध उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. तशेच जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदावर ते कार्यरत असुन मागील पाच वर्षापासून त्यांनी आपल्या लेखनिच्या माध्यमातून डिसिपीएस धारक शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे     तशेच विविध वर्तमानपत्रात व स्वतः च्या ब्लॉग च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक विषयांवर लेखन करत आहेत. 
    शिक्षकांच्या समस्यांची सखोल जाणीव,निर्भीड पणा  आणि उत्तम  संघटन कौशल्य यामुळे त्यांची कास्ट्राईब  शिक्षक संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्यांची सरचिटणीस पदी निवड झाल्यामुळे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधव, उपाध्यक्ष संदिप पाटील, कार्याध्यक्ष गणेश जाधव, पालघर तालुका अध्यक्ष राजन गरूड तशेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कार्यकर्ते व डिसिपीएस धारक शिक्षक,  सफाळे शैक्षणिक बिटातील   सर्व शिक्षक आणि मिञ मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1 comment:

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...