Friday, January 8, 2021

*पालघर नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अभियान जन जागृती रॅलीने सुरु*

*पालघर नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अभियान जन जागृती रॅलीने सुरु*
पालघर(हिरालाल लोखंडे) शुक्रवार दिनांक ८ जानेवारी २०२१ 
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार  पालघर नगरपरिषदेने  शहरात माझी वसुंधरा  अभियान सुरु केले आहे 
1 जानेवारी २१ रोजी  माझी वसुंधरा म्हणजेच हवा - पाणी - पृथ्वी - झाडे - प्रकृती ह्याचे रक्षण करण्याची शपथ  नगरपरिषदेत  घेतली .

आज शुक्रवार दिनांक  ८  जानेवारी रोजी जनजागृती रॅली चे आयोजन केले होते ,ह्या रॅलीत नगराध्यक्ष डॉ सौ उज्ज्वला केदार काळे ,उपनगराध्यक्ष उत्तम घरत ,मुख्याधिकारी स्वाती   देशपांडे, आरोग्य सभापती अमोल पाटील ,महीला व बालकल्याण सभापती सौ राधा  पामाळे ,नगरसेविका श्रीमती  अनुजा तरे ,नगरसेवक चंद्रशेखर  वडे ,नगरसेवक राजेद्र पाटील ,केदार काळे ,प्रजापती ब्रम्हकुमारी संस्था पदाधिकारी ,जायन्ट्स क्लब पदाधिकारी , सर्व कर्मचारी समाजसेवक उपस्थित होते  .
ओला ,सुका कचरा  प्लॅस्टिक  वेगवेगळे जमा करा व वेगळा ठेवा .
प्लॅस्टिकची बंदी 
घरातील वाढदिवस ,बारसे , लग्नाचा वाढदिवस अशा चांगल्या कार्यक्रमात  पाच झाडे लावा 
जमिनीची धुप थांबवण्यासाठी वृक्ष लागवड 
ज्या सोसायट्या माझी वसुंधरा अभीयानात भाग घेतील व चांगले काम करतील त्याना स्टार रेटीग 
मुलांन मध्ये जागृती साठी निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा घेण्याय येणार आहे 
सायकल  रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...