Friday, January 8, 2021

नाशिक एकलहरे मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थांकरीता तीन दिवसीय Induction Program यशस्वीरीत्या संपन्न झाला. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

नाशिक एकलहरे मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसी मधील  प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थांकरीता तीन दिवसीय Induction Program यशस्वीरीत्या संपन्न झाला.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
 नाशिक एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता तीन दिवसीय Induction Program घेण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान पहिल्या दिवशी दिनांक ०६/०१/२०२१, बुधवार रोजी मनशक्ति रिसर्च सेंटर, लोणावळा येथील प्रख्यात तज्ञ श्री.सतीश बापर्डेकर यांचे 'मनाची एकाग्रता व ध्यान '' या विषयावरती online व्याख्यान आयोजित करन्यात आले व या कार्यक्रमानंतर प्राचार्य गोकूळ तळेले सरांनी विद्यार्थांच्या भावी आयुष्या साठी प्रेरनास्पद संबोधित भाषण केले. तसेच दुसऱ्या दिवशी "हरे राम, हरे कृष्णा" , ISKCON संस्थान नाशिक येथील सुप्रसिध्द श्री. सुकुमार गौर यांनी "Control to the mind and enhancing grasping power" सदर विषया वरती मार्गदर्शनस्पद व्याख्यान दिले. नंतर विभाग प्रमुख प्रा.प्रशांत पी.चव्हाण सर यांनी विद्यार्थांना प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम, विषय, प्रात्यक्षिक विषयांची गुण विभागनी व औषध निर्माण शास्त्रातील विविध संधि  वाटा या बद्दल सफल मार्गदर्शन केले. तीसऱ्या दिवशी दिनांक ०८/०१/२०२१ शुक्रवार रोजी वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले व नंतर सर्व प्रवेशीत विद्यार्थांना महाविद्यालयातील आवार, वर्ग, प्रयोगशाळा, महाविद्यातील सर्व सोई व सुविधा,  महाविद्यालयातील शिक्षक व त्यांचे विषय या बद्दल सखोल माहिती देण्यात आली. सदर कार्यकमाचे नियोजन मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव कुणाल दराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले आणि फार्मसी डिप्लोमा विभागाचे प्रमुख प्रा.प्रशांत चव्हाण यांच्या तर्फे करण्यात आले व प्रथमवर्ष प्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...