Tuesday, December 8, 2020

अनेक वर्षानी देवीचा पाडा -दंडाचा पाडा रस्ता मागणी पुर्ण होणार प्रकाश सावर केळवा रोड

अनेक वर्षानी देवीचा पाडा -दंडाचा पाडा रस्ता मागणी पुर्ण होणार 
   प्रकाश सावर  केळवा रोड 
   पालघर (हिरालाल लोखंडे)  भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाली तरीही ग्रामीण भागातील पाडे - वस्त्या यांना रस्तेही नसल्याने मुलभूत सुविधा पासुन वंचित आहे. बहुसंख्य आदिवासी वस्ती असलेले पाडे आणि वस्त्या यांना प्राधान्य देऊन त्यांना मूलभूत सुविधा देणे सरकारचे आद्य कर्तव्य असले तरी आदिवासी --दलित वस्तीतील लोकांना सुविधा लवकर दिली जात नाही संघर्ष करावा लागतोच. संघर्ष करुन कामे करवून घेणे न मागता काहीच मिळणार नाही.  
             केळवा रोड रेल्वे स्टेशन भागात व वाकसई ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या दंडाचा  पाडा व देविचा पाडा येथील ग्रामस्थांच्या बाबतीत घडत आहे. अनेक वर्ष संघर्ष करणार्‍या ग्रामस्थांना रेल्वेच्या आडमुठे पणामुळे  पुर्वे कडून पश्चिमेला जाण्यासाठी (रेल्वे  ट्रॅक खालून पुर्व --पश्चिम भाग जोडणारा मार्ग)  रस्ता मिळत नव्हता. सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश सावर, ग्रामपंचायत वाकसई  उपसरपंच श्री उपेश घरत यांनी रस्त्यासाठी कागदोपत्री वेळोवेळी मागणी व सतत पाठपुरावा करून रोखठोकपणे रेल्वे अधिकारी यांना खडेबोल सुनवल्याने दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी रेल्वे ठेकेदार जिग्नेश शहा व रेल्वे अधिकारी यांनी सदर प्रस्ताव या विषयांशी निगडित असलेल्या सक्षम रेल्वे  विभाकडून १२ दिवसात मंजूर करून देण्याचे आस्वासन दिले. व प्रत्यक्ष रेल्वेच्या पुलाखालून जाणाऱ्या जागेवर  ठेकेदार , रेल्वे अधिकारी श्री प्रकाश सावर सरपंच उपेश घरत, समीर घरत, योगेश पाटील, सुभाष किरमीरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल हाडळ, संदीप खैराडे, अनेक तरूण कार्यकर्ते यांच्या समक्ष रेल्वे अधिकारी यांनी मागणी मान्य केली असल्याने सामान्य जनतेचा उत्साह वाढला आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...