Tuesday, December 8, 2020

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्यादिनांक :- ०९.डिसेंबर २०२०वार :- बुधवार

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्या
दिनांक :- ०९.डिसेंबर २०२०
वार     :- बुधवार

१) शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसहीत पाच नेते आज राष्ट्रपतींना भेटणार; कोविड प्रोटोकॉलमुळे पाचच नेते राष्ट्रपतींना भेटणार

२) कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; केंद्र सरकार 'या' कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

३) उत्तर प्रदेश : नेहरुंच्या पुतळ्याची विटंबना; काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुतळ्यासमोरच धरणे आंदोलन; झाशी जिल्ह्यामधील इलाइट चौकातील नेहरुंच्या पुतळ्याची केली तोडफोड

४) भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा कठीण; निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचे विधान

५) राज्यात दिवसभरात ४ हजार २६ नवे कोरोना रुग्ण आढळले; ६ हजार ३६५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट ९३.४२ टक्के

६) शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यास असमर्थ ठरणार्या पुणे महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ८० लाखांचा ठोठावला दंड; ही रक्कम तातडीने जमा करण्याचे दिले आदेश

७) न्यूझीलंडमधील हल्लेखोराचे तीन महिने भारतात वास्तव्य; २१ नोव्हेंबर २०१५ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान तो भारतात राहिला नंतर इतर देशांना भेट दिली.

८) फायझर लशीमुळे १० दिवसांत संरक्षण; अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाला सादर केलेल्या अहवालातील माहिती

९) ब्रेक डान्सिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश; ब्रेक डान्ससोबतच सरफिंग, स्केटबोर्डीग व स्पोर्टस् क्लायम्बिंग या तीन खेळांनाही ऑलिम्पिकमध्ये स्थान

१०) देशातील गरीब व गरजू मुलींच्या शिक्षणासाठी अभिनेत्री तापसी पन्नू 'नन्ही कली' अभियानात सहभागी; अंशुला कपूर यांची फॅनकाईंड ही स्वयंसेवी संस्था आणि तापसी एकत्र येऊन नन्ही कली अभियान पुढे नेणार

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...