Monday, December 7, 2020

भारतीय लष्कर ध्वज दि ना निमित्त शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे . कोविड चे पालन करून कार्यक्रम संपन्न

भारतीय लष्कर ध्वज दि ना निमित्त शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे . कोविड चे पालन करून कार्यक्रम संपन्न.
(प्रतिनिधी) दी.०७/१२/२०२०- सोमवार रोजी भारतीय लष्कर ध्वज दिनानिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गिरगाव येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा या पथकाने कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र- गुजरात  सिमेवरील नारायठाणा पोलीस चौकी येथे सामाजिक जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला असून ह्या मध्ये कोविड -१९ शी लढा देत स्वच्छ हात धुने,सेनिटायझरचा वापर,मास्क लावणे,स्वच्छता पाळणे, झाडे जगवा ह्या सारख्या पोस्टरचा वापर करण्यात आला.
ह्या उपक्रमात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मोहन भाऊ व सदस्य , नारायण पोलीस ठाणा चौकीतील सर्व पोलीस कर्मचारी वर्ग ,तलासरी आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्त्री अधिक्षीका ,श्री. हर्षद यशवंत चौधरी (माध्यमिक शिक्षक) व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
सदर उपक्रम हा शाळेचे मुख्याध्यापक व पालघर भारत स्काऊटस् आणि गाईडस् हृयांच्या मार्गदर्शना खाली पार पडला.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...