Monday, December 7, 2020

*तारापूर कार्यक्षेत्रामध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा बाबत मनाई आदेश लागू*

*तारापूर कार्यक्षेत्रामध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा बाबत मनाई आदेश लागू*
पालघर (प्रतिनिधी)दि. 07 : राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण, नवी दिल्ली यांचेकडील दावा क्र. 64/2016 मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांना आदेशित केलेले असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर येथील उद्योगांचे सर्वेक्षण करत असतांना बरेचसे टँकर पाणी वाहून नेत असतांना आढळले व विविध प्रकारचे घातक टाकाऊ रसायनांची वाहतूक  करुन अनधिकृतपणे विल्हेवाट लावून परसिरात रासायनिक दर्प पसरतो. त्यामुळे सभोवतालच्या परिसरातील पर्यावरणाचा -हास होतो. तसेच महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर कार्यक्षेत्रामध्ये टँकरव्दारे पाणी उपलब्ध करुन पाण्याचा वापर अधिक करीत असल्याने अधिकचे effluent तयार होऊन त्यामुळे अस्तित्वात असलेली 25 MLD CETP वर विपरीत परिणाम होत असल्याचे निर्देशनास आले आहे.
महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर येथील पाणी पुरवठा करणारे टैंकर बंद केल्यास पाण्याचा वापर कमी होऊन effluent कमी तयार होऊन परिसरामध्ये प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर येथे पाण्याचा पुरवठा करणारे टैकरची वाहतूक करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (2) व (3) आणि कलम 133 अन्वये दि.05/12/2020 रोजी पासून ते दि.02/02/2021 रोजी पर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये फायरटेंडर वाहने वगळण्यात आली आहेत व असाधारण परिस्थितीत पाण्याच्या टँकरची वाहतूक करावयाची झाल्यास MIDC ची पूर्वपरवानगीने वाहतूक करावी असे आदेशात नमूद केले आहे.
तरी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळ, तारापूर येथील सर्व औद्योगिक, उद्योग व इतर आस्थापनांनी सदरहू मनाई आदेशाचे पालन करणेबाबतचे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ माणिक गुरसळ,  यांच्याकडून करण्यात आले आहे.

*************

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...