*तुम्ही सर्वानी एकी ठेवा मी तुमच्या सोबत आहे - खासदार गावित साहेब*
बोईसर (प्रतिनिधी)रेल्वेचा दुपदरी पुल काटकरपाडा (बोईसर ता व जि पालघर ) येथून जाणार आहे ह्या बाबत काटकरपाड्यातील अनेक वर्षे राहणाऱ्या नागरीकांचा विरोध आहे .तशा नोटीसा वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत .
म्हणून माननीय खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्याना काटकरपाड्यातील रहीवाशानी बोलाविले व आपले गाऱ्हाणे खासदार गावित साहेबान समोर मांडले तेव्हा खासदार गावित साहेब म्हणाले तुम्ही सर्वानी एकी ठेवा मी तुमच्या सोबत आहे .
बोईसर ग्रामपंचायती मध्ये असलेला काटकर पाड्यात शंभर ते दीडशे वर्षे आदिवासी समाज रहातो व शेती व कामधंदा करतो .
पेसा कायद्या अंतर्गत येणाऱ्या काटकर पाडा ,रेल्वेच्या दुपदरी पुला मुळे पुर्ण पणे उध्वस्त होणार आहे . तसेच शेतीची सुपीक जमीन ही ह्या पुलामुळे जाणार आहे .
मा खासदार श्री गावित साहेबानी रहीवाश्याना एक जुटीने राहण्याचे आवाहन केले व ह्या समंधी रेल्वे आधीकारी व भूसंपादन आधीकार्याशी बैठक घेउन न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे सांगीतले.
No comments:
Post a Comment