सफाळे-- ( हिरालाल लोखंडे) ) वीज -चोरी हा आजचा विषय नाही,यामुळे त्यावर कारवाई होऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, काही ठिकाणी खुल्ले आमपणे संध्याकाळ नंतर वीजमंडळच्या विद्युत भारीत वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी होते तर काही ठिकाणी मीटरच्या मागे छुप्या वायरी टाकून.
वीज चोरीला आळा ( बंदी) ) घालण्यासाठी सफाळे उपविभागातील सोनाव -- मुस्लीम पाडा, टेंभिखोडावे, केळवा, जलसार, विराथन ख्रु. विराथन ब्रु. मांडे माकणे, वेढी, व इतर गावामधून अचानक धाडसत्र टाकून एकूण ६२ ग्राहकांनी केलेली ६६८०४ युनिट विजेची चोरी पकडण्यात आली. त्या वीजचोरा विरुध्द भारतीय विद्युत कायदा कलम १३५ च्या अनुसार कारवाई करुन वीजचोरीपोटी देयक ( बिल ) रूपये ८७१८७५ /- ( अक्षरी आठ लाख एकात्तर हजार आठशे पंच्याहत्तर रूपये ) चे वीजचोरीपोटी देयक ((बिल ) व तडजोड रक्कम रूपये २,०९००० /- ( अक्षरी दोन लाख नऊ हजार )वसूल होणार आहे ,अजुनही १५ विजग्राहक यांना अनाधिकृत पणे विजेचा वापर करताना पकडण्यात आले असून रूपये ६,०६९०१ /- ( अक्षरी सहा लाख सहा हजार नऊशे एक रूपये ) रूपये यांची देयक ( बिल ) देण्यात आली असून यापुढेही विजचोरा विरूध्द अशीच कारवाई सुरू राहणार आहे
श्री, दिनेश अग्रवाल -मुख्य अभियंता महावितरण कल्याण परिमंडळ, सौ, किरण नागावकर -- अधिक्षक अभियंता पालघर मंडळ, श्री, प्रताप मचिये - कार्यकारी अभियंता पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री, मुकुंद देशमुख - उपकार्यकारी अभियंता सफाळे विभाग यांच्या नेतृत्वाखाली श्री विक्रम ईदाते श्री तात्यासो जगताप श्री वेंकटेसन श्री राहुल शिलावंत सर्व सहाय्यक अभियंता सफाळे विभाग तसेच महावितरणांचे कर्मचारी यांनी विजचोरा विरूध्द मोहिम राबवून महावितरणास लाखो रूपयांचा फायदा करून दिल्याने वरिष्ठ पातळीवरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे तर विजचोर धास्तावले आहेत
No comments:
Post a Comment