*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०६.नोव्हेंबर २०२०
वार :- शुक्रवार
▪️ मोदी सरकार भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन लस लाँच करण्याच्या तयारीत; फेब्रुवारीत ही लस लाँच करण्याची शक्यता
▪️ ही माझी शेवटची निवडणूक; बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मतदारांना भावनिक आवाहन
▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर आणि खरेदीवर बंदी; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
▪️ अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशीही प्रतीक्षेतच; कोरोनामुळे वाढलेल्या टपाली मतांची मोजणी सुरूच
▪️ हिंमत असेल तर फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेऊनच दाखवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आव्हान
▪️ महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आता विशेष कक्ष; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
▪️ पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद; मराठा समाजाच्या पायी दिंडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
▪️ भारतामध्ये आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार; एनपीसीआयने दिली परवानगी
▪️ मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामन्यात मारली धडक
▪️ सुबोध भावेची 'चंद्र आहे साक्षीला' नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका पाहता येणार
No comments:
Post a Comment