Friday, November 6, 2020

*अतिवृष्टी व पुरामुळे तसेच क्यार " व " महा " चक्रीवादळामुळे नुकसा झालेल्या नुकसानग्रस्त यांना लवकरच अनुदान वाटप करणार*

*अतिवृष्टी व पुरामुळे तसेच क्यार " व " महा " चक्रीवादळामुळे   नुकसा झालेल्या नुकसानग्रस्त यांना लवकरच अनुदान वाटप करणार*  
जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
                                                                   पालघर (प्रतिनिधी) 6 :    जुलै - ऑक्टोबर २०१ ९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये १२५३ ९ ०००० / - ( अक्षरी बारा कोटी त्रेपन्न लाख नव्वद हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ६२६ ९ ५५०० / - / - ( अक्षरी सहा कोटी सव्वीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपये मात्र ) इतके अनुदान शासन महसूल व वन विभाग यांचेकडून प्राप्त झालेले आहे . सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात आले असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. 

तसेच  ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१ ९ मध्ये झालेल्या " क्यार " व " महा " चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये ४२७४७८००० / - ( अक्षरी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये मात्र ) अनुदानाची मागणी करण्यात आली होती . त्यापैकी रक्कम रुपये ३८ ९ ५६७००० / - ( अक्षरी अडोतीस कोटी पंच्याण्णव लाख सदुसष्ट हजार रुपये मात्र ) इतकी मदत बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली होती . उर्वरीत रक्कम रुपये ३७ ९ ११००० / - ( अक्षरी तीन कोटी एकोणऐंशी लाख अकरा हजार रुपये मात्र ) इतके अनुदान शासन , महसूल व वन विभाग , मंत्रालय मुंबई यांचेकडून प्राप्त झालेले आहे . सदरच्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणेबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना आदेश देण्यात असून ते लवकरच नुकसानग्रस्त यांना प्राप्त होतील असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यानी सागितले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...