Sunday, November 8, 2020

भा.ज.पा. वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश तर्फे नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक (पॅरामेडिकल विंग)पदी मोहन निकम यांची नियुक्ती

भा.ज.पा. वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश तर्फे नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक (पॅरामेडिकल विंग)पदी मोहन निकम यांची नियुक्ती. 
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

मा.आ. चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेश अध्यक्ष वैद्यकीय आघाडी व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी आ.गिरीश महाजन यांच्या आदेशान्वये मोहन निकम यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक (पॅरामेडिकल विंग) या पदावर नियुक्ती करण्यात आली.
 मोहन निकम नाशिक यांचा अनेक वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव, गोरगरीब जनता, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी असलेला सलोखा, सेवावृत्तीभाव  आणि कोरोना सारख्या महामारी च्या काळात त्यांनी दिलेले अमूल्य  योगदान व सेवा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, प्रदेश संयोजक होमिओपॅथी विंग भालचंद्र ठाकरे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. प्रशांत पाटील, सहसंयोजक विलास भदाणे पॅरामेडिकल विंग,  यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...