Saturday, November 7, 2020

नाशिक रोड येथील मनसे पदाधिकाऱ्यांचे उपनगर व गुरुद्वारा परिसरात अनोखे व आगळे-वेगळे आंदोलन.

नाशिक रोड येथील मनसे पदाधिकाऱ्यांचे उपनगर व गुरुद्वारा परिसरात अनोखे व आगळे-वेगळे आंदोलन.
 
 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सेंट जेवियर स्कूल उपनगर व गुरुद्वारा नाशिक रोड या परिसरात अनोखे व आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. वरील ठिकाणी गतिरोधक आहेत पण  गतिरोधकावर कुठल्याही प्रकारचे पट्टे किंवा रिफ्लेक्टर नाहीत व रस्त्याच्या कडेला गतिरोधक असल्याचे फलक सुद्धा नाही. काही दिवसापूर्वीच या ठिकाणी अपघात झाल्याने एक महिला मृत्युमुखी पडली व या ठिकाणी अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत तरी अजून किती लोकांचे बळी गेल्यावर संबंधित प्रशासन जागे होणार असा सवाल मनसे पदाधिकारी विभाग अध्यक्ष विक्रम कदम यांनी केला. वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही म्हणून या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फलक हातात घेऊन आंदोलन केले, या फलकात असे नमूद केले होते की, 
 पुढे गतिरोधक आहे, गतिरोधकावर पांढरे पट्टे नाहीत, वाहने सावकाश चालवा,
आपले बेफिकीर दत्तक नाशिक ग्रामपंचायत,
कनवाळु महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभाग. मनसेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे नागरिकांनी स्वागत केले. या आंदोलनात मनसे नाशिक रोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, उपचिटणीस कामगार सेना प्रकाश कोरडे, उपजिल्हाअध्यक्ष संतोष सहाणे, उपशहराध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे, विनायक पगारे, निरीक्षक प्रमोद साखरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाजीराव मते, रवि कडजेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...