*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०८.नोव्हेंबर २०२०
वार :- रविवार
● पुढील मोसमी पावसाच्या काळात मलेरियाची साथ कोणत्या भागात पसरू शकते याचा अंदाज भारतीय हवामान विभाग देणार; पृथ्वी विज्ञान विभागाचे सचिव एम. राजीवन यांची माहिती
● तंत्रज्ञानातून गरिबांचे जीवन सुकर करा : पंतप्रधान मोदी; दर्जावर लक्ष देऊन काम करा, तडजोडी करू नका; दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा पदवीदान समारंभ
● दिल्लीतील अत्याचारपिडितांपैकी ३१ टक्के अल्पवयीन; गेल्यावर्षी दिल्लीत अत्याचाराचे ३१३७ गुन्हे नोंद झाले आहेत
● महाराष्ट्रात दिवसभरात ३ हजार ९५९ नवे कोरोना रुग्ण, अॅक्टिव्ह केसेस एक लाखांपेक्षा कमी; २४ तासांमध्ये १५० कोरोना रुग्णांचा राज्यात मृत्यू
● उत्तर प्रदेशात पुन्हा तरुणीच्या छेडछाडीची घटना; विरोध करणाऱ्या वडिलांची आरोपींनी केली हत्या; गुंडांनी लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी केली बेदम मारहाण
● बिहारमध्ये सत्तापालटाचा अंदाज; राजद-काँग्रेसला जनतेचा कौल; तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती
● जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!
● अरब अमिरातीमध्ये मुस्लीम वैयक्तिक कायदे शिथिल; नव्या नियमामुळे मुस्लिमांना मद्यप्राशनाची, अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा
● जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज; मुंबईच्या गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी केलं कौतुक
● सात वर्षांनी दिसणार महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण ऑन स्क्रिन; अजय करणार दिग्दर्शन; 'मेडे' असं या नव्या सिनेमाचं नाव आहे
No comments:
Post a Comment