Friday, November 6, 2020

पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि . १०/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितानी अर्ज सादर करावेत*

*पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि . १०/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितानी अर्ज सादर करावेत*
पालघर (प्रतिनिधी) दि :  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , वसई मु . पो . चंदनसार - भाटपाडा , विरार ( पूर्व ) ता , वसई , जि . पालघर  येथे परीवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहन नोंदणीसाठी सध्या Bx हि मालिका सुरु आहे.सदर मालिका दि . ० ९ / ११ / २०२० पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने परीवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहन नोंदणीसाठी BY ही मालिका सुरु करण्यात येणार आहे . सदर नवीन मालिकेतील आकर्षक वा पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि . १०/११/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितानी अर्ज सादर करावेत . आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहित शुल्क आकारून नोंदणी चिन्ह आरक्षित कारण्यात येईल . जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरूपातील धनाकार्ष या कार्यालयास जमा करावेत . दुसऱ्या दिवशी 4 वाजता त्यांचे समोर सादर केलेले लिफाफे उघडले जातील . ज्याचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कारवाई करण्यात येईल .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...